लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : वडगाव डिघी येथील शिक्षक राजेश ढोले याच्यावर मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाल्यानंतर सदर शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे.मंगळवारी सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी पाऊस सुरू असल्याने तिसर्या वर्गात शिकणार्या आपल्या भावास छत्री घेऊन आणावयास गेलेल्या १४ वर्षीय मुलीचा शिक्षक राजेश ढोले याने विनयभंग केला होता. सदर मुलीने याबाबत मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार केल्याने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे या शिक्षकावर भादंवि कलम ३५४, ५0६ व बालसंरक्षण कायदा ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच सदर शिक्षकाला नातेवाइकांनी चोपही दिला होता. शिक्षकास बुधवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथून ताब्यात घेण्यात आले होते. सदर शिक्षकास गुरुवारी दुपारी मलकापूर न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून, बुलडाणा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
विनयभंग करणारा शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:37 AM
नांदुरा : वडगाव डिघी येथील शिक्षक राजेश ढोले याच्यावर मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाल्यानंतर सदर शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देवडगाव डिघी येथील शिक्षक राजेश ढोले याच्यावर गुन्हे दाखल