बुलढाणा: येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर १२ जुलै पासून सुरू झालेल्या सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १५ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये सहकार विद्यामंदीर (एसव्हीएम) आणि शारदा ज्ञानपीठच्या मुलांच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. १३ जुलै रोजी सकाळी ९ वाजात या दोन्ही संघात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.या स्पर्धेत पहिल्या उपांत्यफेरीत शारदा ज्ञानपीठने मलकापूर येथील स्कूल ऑफ स्कॉरलचा एकतर्फी सामन्यात ३-० अशा गोलफरकाने पराव केला. शारदा ज्ञानपीठ संघाचे चेंडूवरील नियंत्रण वाखाणण्या जोगे होते. यासंपूर्ण सामन्यावर शारदा ज्ञानपीठच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. स्कूल ऑफ स्कॉलरच्या संघाला सामन्यात साधी परतीचीही संधी या संघाने दिली आहे. एखाद्या कसलेल्या व मुरब्बी अशा संघासारखा खेळ शारदा ज्ञानपीठच्या खेळाडूंनी केला.
प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव आर. एन. वानखेडे, क्रीडा अधिकारी केळे, क्रीडा पत्रकार रविंद्र गणेशे, फुटबॉल असोसिएशनचे संचलाक शेख अहमद शेख सुलेमान उर्फ शब्बू भास्यांच्यासह स्पर्धेचे संयोजक मनोज श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेत मुलांच्या ८ व १७ वर्षाखालील मुलींच्या पाच संघांनी सहभाग घेतला होता.
मुलींमध्ये प्रबोधन विद्यालयाचा संघ अजिंक्य ठरला असून या संघाने यशोधाम पब्लिक स्कूल मलकापूरच्या संघाचा ४-० असा फरकाने परभाव केला. दरम्यान सतरा वर्षाखालील मुलांचे सामने १३ जुलै रोजी होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून शेख फव्वाद, राणा औशलकर यांच्यासह त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.
एसव्हीएमचे तीन मिनीटात तीन गोलसहकार विद्यामंदिराच्या बुलढाणा येथील मुलांच्या १५ वर्षाखालील संघाने उपांत्य फेरीत धडाकेबाज कामगिरी करत पहिल्या तीन मिनिटामध्येच लागोपाठ तीन मैदानी गोल करत हा उपांत्य सामना एकतर्फी केला. या सामन्यात ४-० अशा फरकाने त्यांनी लोणार पब्लिक स्कूलचा पराभव केला. धनंजय लोनसुने आणि रुद्र बागवान या दोघांनी हे गोल केले. यासंपूर्ण स्पर्धेत धनंजय लोनसुनेने त्याच्या खेळाने सर्वांना प्रभावीत केले आहे. प्रारंभी पहिल्याच सामान्या त्याने केलेल्या एका उत्कृष्ट मैदानी गोलच्या जोरावर सहकार विद्यामंदिराने उपांत्यफेरीत धडक मारली होती. या संघाच्या खेळाडूंचा आपसी समन्वय व चेंडू पास कारण्याची क्षमता वाखाणण्या जोगी होती.