शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुंबईला जाणारे दुध 'स्वाभीमानी' रोखणार; १६ जुलै पासून आंदोलनात्मक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:59 IST

बुलडाणा : दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी त्वरित द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबईला होणारा दुध पुरवठा १६ जुलै पासून रोखण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देप्रत्यक्ष दुध उत्पदक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतीलिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान थेट जमा करावे, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. कर्नाटकच्या धर्तीवर शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात हे अनुदान जमा करावे, अशी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. असा इशाराच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

बुलडाणा : दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी त्वरित द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबईला होणारा दुध पुरवठा १६ जुलै पासून रोखण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. राज्यात गायीच्या दुधाचे एक कोटी पाच लाख लिटरच्या आसपास संकलन होते. तर दुध संघाला प्रती लिटर तीन रुपये अनुदान देण्यात आले आहे. मात्र दुध संघाने ते अन्यत्र वळवले आहे. प्रकरणी प्रत्यक्ष दुध उत्पदक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतीलिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान थेट जमा करावे, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. कर्नाटकच्या धर्तीवर शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात हे अनुदान जमा करावे, अशी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. सोबतच ऊस उत्पादक शेतकर्यांची दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी थकलेली आहे. तीही त्वरेने देण्यात यावी, अन्यथा १६ जुलै पासून मुंबईला होणारा दुधाचा पुरवठा रोखण्यात येईल, असा इशाराच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. विदर्भातूनही मुंबईला जाणारे दुध रोखण्यात येईल, असे तुपकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विदर्भातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या प्रश्नावरही स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतलेली असून २८ जून रोजी अमरावती येथे यासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. विदर्भातही या दोन्ही पिकाच्या भावासंदर्भात स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून विदर्भातही आक्रमक पवित्रा या पिकांच्या भावा संदर्भात घेणार असल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकरRaju Shettyराजू शेट्टी