मोताळा : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर यासोबतच राज्यात आता रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या आवाहनानुसार मोताळा येथे १६ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी स्वत: रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले.
रविकांत तुपकर सध्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. परंतु त्यांच्या पश्चातही स्वाभिमानीची टीम जिल्ह्यात सक्रियपणे कार्यरत असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोताळा तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ॲड. शर्वरी तुपकर यांनी केले. स्वत: रक्तदान करून त्यांनी कार्यकर्त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. कोरोनाच्या या संकटकाळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्वाभिमानीने या शिबिराच्या माध्यमातून मोठा आधार दिला आहे. या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांचादेखील समावेश आहे, हे विशेष. या वेळी स्वभिमानीचे राणा चंदन, बी.डी.ओ. अरुण मोहोड, राष्ट्रवादीचे नेते शरद काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील घाटे, मोमीन अहमद, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील, महादेव तायडे, शेषराव बोदडे, जानराव मेढे, ईश्वरसिंग राजपूत, पत्रकार गणेश पाटील, स्वभिमानीचे तालुकाध्यक्ष, सय्यद वसीम, प्रदीप शेळके, महेंद्र जाधव, राजेश गवई, विजय बोराडे, दत्ता पाटील, भागवत धोरण, निखिल पाटील, मारोती मेढे, शुभम मेढे, गजानन गवई, अमर सरकटे, विनोद धुरंदर, शुभम महाले, नीलेश पुरभे, संजय तायडे, रमेश जोशी, राजू पन्हाळकर, उमेश राजपूत, स्वप्निल टेकाळे, निनाजी घाटे, चरण राजपूत, जीवनसिंग राजपूत, संतोष गवई, प्रकाश गोरे, परमेश्वर सुरडकर, योगेश माहोरे, सुशील अहिरे, चंदू गवळी, सागर पुरभे, शेख आमीर शेख जाबीर यांच्यासह स्वभिमानीचे कार्यकर्ते तसेच सम्राट अशोक क्रीडा मंडळ कोथळीचे सदस्य उपस्थित होते.
या शिबिरात ॲड. शर्वरी रविकांत तुपकर, विजय बोराडे, दत्ता पाटील, राजेश गवई, शुभम मारोती मेढे, रमेश जोशी, उमेश राजपूत, डॉ. शरद काळे, भागवत धोरण, रोहन सरकटे, श्याम सरकटे, विनोद धुरंदर, संग्राम पाटील, आशिष सरकटे, आकाश धनवटे, दीपक राजूरकर, श्रीराम खर्चे, श्याम वखरे, कु. पूजा शेळके, सौ. राधा तुपकर, अमोल सरकटे, प्रकाश गोरे, प्रतीक सिरसाट, राजू पन्हाळकर, केवलसिंग ठाकूर, विनोद शेळके, मनोहर सूर्यवंशी, हबीब तडवी, राजेश जाधव, योगेश माहोरे, जुबेर पटेल, रोहिदास पठ्ठे, सागर जाधव, रवींद्र मानकर, शुभम वले आदींनी रक्तदान केले.