खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होईपर्यंत एकही मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी (26 ऑक्टोबर) राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांचा ताफा अडवला. यावेळेस जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आणि कार्यकर्त्यांनी शेगाव खामगाव रोडवर खोत यांचा ताफा अडवला. शिवाय, खोत यांना बुलडाणा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करा. अशी मागणी करणारे निवेदन त्यांना देण्यात आले.