संग्रामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी येथिल तहसील कार्यालयावर संताप मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी जनावरा सह सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर फडणवीस सरकार फेल ठरल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या साठी आंदोलन करण्यात आले. सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास 26 जानेवारी रोजी उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिले. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई दया, जनावरांना चारा दया, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दया, सरसकट कर्जमाफी देवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागण्यासांठी असंख्य शेतकरी या संताप मोर्चा सहभागी झाले होते जिल्हयात दुष्काळ जाहीर केला मात्र, दुष्काळाच्या उपाय योजना अदयाप लागू केल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उबंरठयावर आहे. यापूर्वी वेळोवेळी शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केलीत, या शांततेच्या आंदोलनाची भाषा सरकारला कळत नसेल तर यापूढे येत्या २६ जानेवारी नंतर कोणत्याही क्षणी तालुक्यातील शेतकरी नक्षलवादयांच्या रूपात समोर येतील व त्याचे होणारे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा डिक्कर यांनी दिला. निवेदन देतेवेळी स्वाभिमानीचे विधानसभा संपर्क प्रमुख मोहन पाटील, तालुका अध्यक्ष उज्वल चोपडे, अनंता मानकर, योगेश मुरूख, नंदकिशोर बोडखे, सुनिल अस्वार, विलास तराळे, योगेश वखारे, अशिष नांदोकार, गजानन आमझरे, राजू उगळकार, गोकुळ गावंडे,सागर खानझोडे, पांडूरंग भिसे, हरीदास आमझरे हे उपस्थित होते.