स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून बैलजोडी, नांगराची पूजाबुलडाणा: शेतकºयाला चांगले दिवस यावे व तो सुखी व्हावा, म्हणून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलजोडी व नांगराची पुजा करण्यात आली.दिवसरात्र शेतात राबून शेतकरी कष्ट करतो. मात्र त्याच्या मालाला भाव मिळत नाही. सध्याचे सरकार शेतकºयांना सुविधा देत नाही. आजही शेतकºयांना अच्छे दिन आले नसून तो नावालाच बळीराजा राहीला आहे. बळीराजा हा लोककल्याणकारी, चारित्र्यवान, रक्षणकर्ता व दानशुर राजा होता. वामनाने बळीराजाला कपटाने पाताळात धाडले, अशी अख्यायिका आहे. तेव्हापासून ईडा -पिडा -टळो आणि बळीचे राज्य येवो अशी म्हण रुढ झाली. मात्र अजूनही बळीचे राज्य आले नाही. बळीराजा सुखी झाला नाही. सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकºयांप्रती सरकारची अनास्था, कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या यामध्ये बळीराजा होरपळत आहे. बलीप्रतीपदेच्या दिवशी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, शर्वरी तुपकर यांनी शेतकºयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकºयांचे औक्षण करुन बैलजोडी आणि नांगराची पुजा केली. बुलडाणा येथील निवासस्थानासमोर शेतकरी विजय बाहेकर, विलास गोसावी, संदिप जेऊघाले या शेतकºयांचे औक्षण केले. यावेळी राणा चंदन, शे. रफिक, कडूबा मोरे, नीलेश राजपूत, भारत फोलाने, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, मनोज जैस्वाल, दत्ता जेऊघाले, गोटू जेऊघाले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून बैलजोडी, नांगराची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 5:58 PM