लोकमत न्युज नेटवर्कशेगाव - दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,यासह अन्य मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळसदृश्य निर्माण झाली आहे. यावर्षी सोयाबीन कापूस शेतकऱ्यांच्या हातातून गेला असून रब्बी हंगाम सुद्धा संपल्यात जमा आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना चारा पशुपालक जनावरे बाजारात विक्रीसाठी नेत आहेत.सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु अद्याप पर्यंत मिळणाऱ्या सवलती देण्यात आलेल्या नाही अजूनही बँक, फायनान्स, मायक्रो फायनान्सकडून कर्जाची वसुली सुरू आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आ वासून उभा आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,जनावरांच्या दावणीला चारा द्यावा,सक्तीची वसुली बंद करावी,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी यासह 8 मागण्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवानेते उमेश शेळके यांचे नेतृत्वात तहसील कार्यालया समोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.यामध्ये उमेश शेळके अभिजित महल्ले,रघुवीर बिचारे,शे अय्याज शे अमीर,अंकित सोनोने,मोहन झाडोकार,सागर बावणे,गोपाळ बजर मंगेश दाभाडे,नरेंद्र सावळे,दत्ता मुंडे,यांचेसह अन्य सहभागी झाले होते.तदनंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डफडे बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 2:33 PM