लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : सन २0१४-१५ मध्ये झालेल्या गारपीट नुकसानाची मदत अद्याप न मिळाल्याने स्वाभिमानी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयात शेतकर्यांसह मु क्काम ठोकला आहे. तालुक्यातील काही गावामधील शेतकर्यांच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने या नुकसानीचे पंचनामेही तत्काळ केले होते. गारपीटमुळे झालेल्या नुकसानाचे अनुदान तहसीलमार्फत सात गावांना वाटप करण्यात आले होते; मात्र एकलारा बानोदा, बानोदा बु. व काटेल या तीन गावांचा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी हेतुपुरस्सरपणे या तीन गावांना गावातील शेतकर्यांना त्यांच्या खात्यात अनुदान रक्कम जमा केली नाही. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी अनुदानाची रक्कम त्वरित शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, यासाठी शेतकर्यांसह २८ डिसेंबरपासून संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात मु क्काम आंदोलन सुरु केले आहे. गेल्या चार वर्षापासून शेतकर्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बर्याच शेतकर्यांनी आत्मह त्या केल्या आहेत. यावर्षीसुद्धा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व पिके शेतकर्यांच्या हातून निघून गेली आहेत. अशा परिस्थितीतही शासन शेतकर्यांना पुन्हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे काम करीत आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी. जोपर्यंत गारपिटीचे अनुदान व शेतकर्यांच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी घेतला होता. आंदोलनात स्वाभिमानीचे रोशन देशमुख, शेख अस्लम, उज्ज्वल चोपडे, अनंता मानकर, तेजराव बोरसे, प्रकाश मेहंगे, आशिष नांदोकार, मनोहर कुकडे यांच्यासह शे तकरी सहभागी झाले आहेत.
‘स्वाभिमानी’चा संग्रामपूर तहसील कार्यालयात मुक्काम; गारपीटग्रस्तांना शासकीय अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:18 AM
संग्रामपूर : सन २0१४-१५ मध्ये झालेल्या गारपीट नुकसानाची मदत अद्याप न मिळाल्याने स्वाभिमानी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयात शेतकर्यांसह मु क्काम ठोकला आहे.
ठळक मुद्दे२0१४-१५ मध्ये झाली होती गारपीटएकलारा बानोदा, बानोदा बु. व काटेल या तीन गावातील शेतकरी शसकीय मदतीपासून वंचित