बुलडाणा : दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात बाजारात बोगस बियाणे येते. हे बियाणे शेतकर्यांना विकल्या जाते. बरेच वेळा हे बियाणे उगवत नाही, कधी-कधी उगवले तर त्याला फुले येत नाही, अशा वेळी शेतकर्यांची फसवणूक होते. वर्षभर शेतीत काबाड कष्ट करून ऐनवेळी बियाणे न उगवल्याने शेतकर्यांचा हंगाम वाया जातो. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. शेतकर्यांची ही फसवणूक होऊ नये व बाजारात अशाप्रकारे बोगस कंपन्यांच्या बियाणाला आळा बसावा आणि शेतकर्यांनी बियाणे खरेदी करताना त्यांनी जागृत रहावे, यासाठी कृषी अधिकारी, सीड कंपनी व बियाणे विक्रेत्यांनी होळीच्या दिवशी बोगस व बेकायदेशीर बियाणाची प्रतीकात्मक होळी केली. यावेळी शेतीमाल विक्रेत्या बांधवांनी शेतकर्यांची फसवणूक होईल,अशा कोणत्याही वस्तूची विक्री करणार नाही, असा संकल्प केला. शेतकर्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी रूपराव उबाळे, डालमिया, अनिल बेदमुथा, डिगांबर कोरडे, रामभाऊ शिंदे, कैलास जाधव, पैठणे तसेच जिल्हा कृषी अधिकारी रमेश भराड, मोहीम अधिकार चोपडे उपस्थित होते.
बियाण्यांची प्रतीकात्मक होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2016 2:16 AM