शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

एका दिवशी आठ हजार जणांना लस देण्याची यंत्रणेची क्षमता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:01 PM

Buldhana News यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. 

ठळक मुद्देकोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीत ते बोलत होते. पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्याचे त्यांनी सूचित केले.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येत्या काळात कोरोना प्रतिबंधासाठी लस येण्याची शक्यता असून, एकाच दिवशी आठ हजार नागरिकांना जिल्ह्यात लस देण्याची क्षमता आहे. त्या आनुषंगाने कोविड लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज ठेवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना अन्न व अैाषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्र्यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अपर पोलीस अधीक्षक बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते  प्रामुख्याने उपस्थित होते. कोविड लसीकरणाची मोहीम ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. त्या आनुषंगाने आरोग्य यंत्रणेसह संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. तसेच पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्याचे त्यांनी सूचित केले. लसीकरण मोहिमेत निवडणुकीच्या धर्तीवरच काम करावे लागणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही यादृष्टीने पूर्वीपासूनच सज्जता ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. लसीकरण मोहिमेत नियमानुसार प्राधान्यक्रम ठरवून कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही याची खात्री यंत्रणांनी करावी. लसीकरण मोहिमेत काही दुष्परिणाम झाल्यास त्यासाठी किट असते. या किटमध्ये औषधे असल्याची खात्री करून घ्यावी. लसीच्या सर्व बाबींचा अभ्यास करून आरोग्य यंत्रणेने तयार रहावे, असे ते म्हणाले.  यासंदर्भातील कामामध्ये कुठलीही कुचराई होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

आवश्यक खरेदीप्रक्रिया राबवालस साठवणुकीसाठी शीत साखळी प्रभावी असण्याची गरज आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिथे लसीकरण करण्यात येणार आहे, अशा ठिकाणी शीत साखळी निर्माण केली जावी. त्यासाठी आवश्यक असलेल्या खरेदीची प्रक्रिया राबविण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यात दिरंगाई होणार नाही हे प्राधान्याने पहावे. लसीकरण करतेवेळी नियमानुसार तीन बुथची व्यवस्था असावी तसचे लसीकरण झाल्यानंतर ॲलर्जी, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास निरीक्षणकक्षही जवळच सुसज्ज ठेवले जावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

लसीकरणासाठी यंत्रणा सज्जलसीकरणासाठी यंत्रणा पूर्ण सज्ज असून, पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान एका दिवशी आठ हजार नागरिकांना लस देण्याची व्यवस्था व क्षमता आरोग्य विभागाची आहे. तसेच लस आल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून आठ दिवसांत लसीकरण सुरू करता येईल, अशी माहिती या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबले आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे