पिंपळगाव सराई: पीक कर्ज वाटपाचा टक्का कमी असल्यामुळे तो वाढविण्याबाबत यंत्रणांना सुचना देण्यात आलेल्या असतानाही रायपूर येथे १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला पीक कर्ज मेळावा रद्द करावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रायपूर येथील तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.बुलडाणा तहसिल कार्यालय व सेंट्रल बँकेच्या रायपूर शाखेच्या वतीने रायपूर येथे या पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याची वेळ ही सकाळी नऊ ते पाच अशी ठेवण्यात आली होती. पीक कर्ज मेळाव्याच्या अनुषंगाने गावात दवंडीही देण्यात आली होती. मात्र वेळेवर प्रशासकीय कामकाजामुळे बुलडाण्याचे तहसिलदार संतोष शिंदे हे पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे हा मेळावा रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रायपूर तलाठी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामध्ये नीलेश राजपूत, शेख रेहान, भरत फोलाने, शेख रशीद, रामेश्वर सिरसाट, सुभाष देशमाने, राजू अप्पा यांच्यासह अन्य शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, तहसिलदार संतोष शिंदे हे रायपूर येथे आले व त्यांनी शेतकºयांची समजूत काढली.
तहसिलदारांची अनुपस्थिती; पीक कर्ज मेळावा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 1:32 PM