बुलढाणा : राज्यभरात २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान पार पडलेल्या शिक्षक अभियाेग्यता चाचणीचा (टीएआयटी) निकाल २४ मार्चपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे़ याविषयी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईट अपडेट देण्यात आले आहे़ राज्यभरातील तीन लाखांच्या वर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे़
राज्यभरातील शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून भरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे़ त्यानुसार २०१७ नंतर शिक्षक अभियाेग्यता परीक्षेचा मुहूर्त शासनाला सापडला हाेता़ ही परीक्षा राज्यभरातील परीक्षा केंद्रावर २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ऑनलाइन पद्धतीने पार पडली आहे़ या परीक्षेचा निकाल ५ मार्च राेजी जाहीर हाेणे अपेक्षित हाेते़ मात्र, निकाल लांबत असल्याने विद्यार्थ्यांनी राेष व्यक्त केला आहे़ एकूण २०० गुणांसाठी झालेली ही परीक्षा अवघ्या १२० मिनिटांची हाेती़ त्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रश्न पाहता ही आले नसल्याचे चित्र आहे़ त्यातच गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांवर भर असल्याने कला शाखेच्या उमेदवारांची तारांबळ उडाली हाेती. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच निवड हाेणार असल्याने निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे़.