बुलडाणा : काेराेनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाइ करण्यासाठी बुलडाणा नगर पालिकेने भरारी पथकाची स्थापना केली आहे. मात्र, हे भरारी पथके लघु व्यवसायीकांकडून वसुली करीत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अनिल बावस्कर यांनी मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. वसुली करणाऱ्या पथकावर कारवाइ करण्याची मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गेल्या एक वर्षापासून सतत लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील लघु व्यावसायीकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांनीइतर बँकेकडून, पतसंस्थेकडून, हात उसनवार रक्कम घेवून आपला व्यवसाय सुरु केलेला असन त्यामधून म
स्वतःचा, कुटूंबाचा व बँकेची परतफेड करीत आहे. बुलडाणा शहरात लॉकडाऊन सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. मात्र, सदर कालावधीत बुलडाणा शहरातील लघु व्यावसायीक हे शासनाने घालून दिलेल्या नियम अटी, शर्ती आणि वेळेचे भान राखून आपला व्यवसाय करीत आहे. तरी सुध्दा नगर परिषद, बुलडाणा येथील भरारी पथकातील काही कर्मचारी हे आपल्या मर्जीने बुलडाणा शहरातील लघु व्यवसायीकांकडून
रक्कम वसूल करीत असल्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे. शहरानजीक असलेले मद्य विक्रीची दुकाने, वाईन बार इ. सर्रासपणे शासनाच्या नियमाचे उल्लंघन करुन चालत आहे.याकडे भरारी पथकातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे.याकडे लक्ष देउन नगर परिषद बुलडाणा चे कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी यांचेवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर निवेदनावर शहराध्यक्ष अनिल बावस्कर, मनाेज चंदन, राजेश गवइ, विशाल फंदाट, अंबरीश घाेडके, गाैश्रव देशमुख यांच्यासह इतरांची स्वाक्षरी आहे.