सागर शेळके यांनी पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दत्तात्रय शेळके यांनी गावातील काही लाेकांकडून व्याजाने पैसे घेतले हाेते. हे पैसे परत देण्यासाठी ते दत्तात्रय शेळके यांना धमक्या देत हाेते. १५ मे राेजी दत्तात्रय शेळके यांना एका शेतात बाेलावण्यात आले. तेथे व्याजाने पैसे देणारे व इतर काहीजण उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी व्याजाने घेतलेल्या पैशाची मागणी केली़, तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. एका महिलेने त्यांच्याविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार पाेलिसात दिली़. या तक्रारीवरून पाेलिसात गुन्हा दाखल झाल्याने दत्तात्रय शेळके यांचे मानसिक संतुलन बिघडून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सागर शेळके यांनी २६ मे राेजी चिखली पाेलिसात दिलेल्या तक्रारीत केली आहे.
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:26 AM