शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

बनावट अल्पसंख्याक दर्जाप्रकरणी कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:41 AM

लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जनता एज्युकेशन सोसायटी या संस्थेस बनावट कागदपत्रांच्या आधारे नोव्हेंबर, २०१९ मध्ये हिंदी भाषिक अल्पसंख्याक ...

लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जनता एज्युकेशन सोसायटी या संस्थेस बनावट कागदपत्रांच्या आधारे नोव्हेंबर, २०१९ मध्ये हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी मिळून आणला होता, परंतु हा अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावामध्ये बनावट कागदपत्र जोडलेली असल्याची तक्रार जनता एज्युकेशन सोसायटीचे मयत सदस्य नाना गायकवाड यांच्या पत्नी श्रीमती केसरबाई गायकवाड यांनी डिसेंबर, २०१९ मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेत, जिल्हाधिकारी यांनी अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे याबाबतचा अहवाल पाठविला होता. त्या अहवालाची चौकशीस तडवी सक्षम प्राधिकारी तथा सहायक सचिव अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय, मुंबई यांनी केली. या प्रस्तावासोबत बनावट कागदपत्र जोडलेले असल्यामुळे १५ जानेवारी, २०२० रोजी जनता एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला असल्याचे उघड झाल्याने, त्यांनी अल्पसंख्याक विभागाचे प्रमाणपत्र तत्काळ या कार्यालयास परत करावे, असा आदेश पारित केला. त्याची दखल घेत, जिल्हाधिकारी यांनी १७ जून, २०२१ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दोषी व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश पारित केला होता, परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लोणार यांच्याकडे हे प्रकरण चौकशीसाठी दिले. या प्रकरणात दाेषींवर अजूनही कारवाई झालेली नाही.

अल्पसंख्याक विभागानेही बनावट कागदपत्र जोडल्याचे लेखी स्वरूपात कळविले आहे. त्यावर जिल्हाधिकारी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पत्रही दिले आहे, परंतु माध्यमिक शिक्षण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लोणार हे या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे येत्या दोन ऑक्टोबर रोजी ते बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

- केसरबाई गायकवाड, अंजनी खुर्द.