बुलडाणा शहरातून दुचाकी लंपास
बुलडाणा : भाेकरदन तालुक्यातील वाढाेना येथील कौतिकराव शाहुबा तायडे यांची दुचाकी क्र. एमएच २१ एझेड ८४७६ अज्ञात चाेरट्याने १९ जुलै राेजी बुलडाणा शहरातील एका रुग्णालयासमाेरून लंपास केली़ या प्रकरणी बुलडाणा शहर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल
बुलडाणा : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता बुलडाणा शहरासह जिल्ह्यात काेराेनाविषयक निर्बंध लावण्यात आले आहे़ सायंकाळी ४ नंतर दुकाने, हाॅटेल बंद करण्याचे आदेश असतानाही धाड नाक्याजवळ निर्धारित वेळेनंतरही हाॅटेल सुरू ठेवणाऱ्या रामचंद्र तोताराम उडदेमाळी याच्याविरुद्ध बुलडाणा शहर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
शिक्षकाची घरासमाेरील दुचाकी केली लंपास
चिखली : शहरातील महावीर नगरात राहणाऱ्या जमीर अहमद शब्बीर अहमद यांची घरासमाेर उभी केलेली दुचाकी क्र. एमएच २८ एटी ३८१९ ही दुचाकी २२ जुलै राेजी लंपास केली़ या प्रकरणी चिखली पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
धाड येथे अवैध दारू जप्त
धाड : पाेलिसांनी धाड टाकून बबलू ऊर्फ अरविंद शेषराव गुजर, शे. अमर शे. महंमद कुरेशी यांच्याकडून देशी दारूसह ५५ हजार १२० रुपयांचा ऐवज जप्त केला़ दाेन्ही आराेपींना सूचनापत्रावर सोडण्यात आले आहे़ पुढील तपास पाेलीस करीत आहेत़
वाहतुकीस अडथळा, चालकावर गुन्हा
मेहकर : शहरातील जिजाऊ चाैकात वाहतुकीस अडथळा हाेईल, असे वाहन उभे केल्याप्रकरणी चालक विनाेद वसंता मगर याच्याविरुद्ध मेहकर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास मेहकर पाेलीस करीत आहेत़
क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण
मेहकर : क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण केल्याची घटना २५ जुलै राेजी अंत्री देशमुख येथे घडली़ या प्रकरणी मनोहर गंभीरराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी आराेपी रामेश्वर काशीराम सरकटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़