कालव्यातून पाणी पाईपलाईनद्वारे देण्याचा प्रश्न
मेहकर : पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाईपलाईनद्वारे देण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे. कालव्यातील पाण्यामुळे यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यांना नुकसानभरपाईसुद्धा मिळालेली नाही.
पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करा
लाेणार : लाेणार सराेवरात पर्यटकांसाठी हेलिपॅड, राेप वेसह विविध साेयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. पर्यटन केंद्राचा विकास झपाट्याने करण्यात येत आहे. मात्र, त्या तुलनेत लोणार सरोवर पर्यटन केंद्र विकासापासून दूरच आहे.
साखरखेर्डा आगाराची मुक्कामी बस बंद
साखरखेर्डा : काेराेनामुळे एस. टी. बसफेऱ्या बंद करण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर अनलाॅक प्रक्रियेंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही चिखली आगाराची साखरखेर्डा ही मुक्कामी बस बंदच आहे.
भाजीपाल्याची बाजारातील आवक घटली
बुलडाणा : गत काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे काही प्रमाणात भाव वाढलेले आहेत. तसेच कांद्याचे भाव दहा रुपयांनी वाढले आहेत.