बुलडाणा: उन्हाळी भूईमुग पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी समूह प्रथम रेषीय प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आले आहे.
------
रस्ता खोदल्याने सामान्यांना त्रास
बुलडाणा: स्थानिक चांडक ले-आऊट परिसरात बांधकामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. गत कित्येक दिवसांपासून येथे साहित्य पडून आहे. त्यामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने गुरूवारी पालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे.
----------
एसटीतून प्रवाशाचा मोबाईल पळविला
मोताळा: एसटीतून मोबाईल पळविल्याची घटना मोताळा स्थानकावर गुरूवारी घडली. मलकापूर येथून बुलडाणाकडे निघालेल्या विजय शेगोकार रा. पळशी यांचा १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल पळविण्यात आला.
----
रागाच्या भरात पत्नीला मारहाण
मोताळा: दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग अनावर झाल्याने एकाने पत्नीला जोरदार मारहाण केली. ही घटना मूर्ती येथे घडली. जखमी झालेल्या कोमल चौहाण यांच्यावर बुलडाणा येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
---
विजयी झालेल्यांना प्रमाणपत्राची प्रतीक्षा
बुलडाणा: जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाला. मात्र, शासनाची अधिसूचना जाहीर न झाल्यामुळे विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
---
युवकाची ऑनलाईन फसवणूक
सिंदखेड राजा: ऑनलाईनमोबाईल खरेदीत एका २६ वर्षीय युवकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार बुधवारी उजेडात आला. सुरज खेडेकर याने ऑनलाईन मोबाईल मागविला असता, त्याला फॉल्टी मोबाईल देण्यात आला. याप्रकरणी पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.
----------------------
भरधाव कारची गाईला धडक
मोताळा: भरधाव कारने एका गायीला जबर धडक दिल्याची घटना बुधवारी वाघजाळ फाट्याजवळ घडली. एमएच ३०- टी ६३९९ च्या कारने गायीला धडक दिली. यात गायीच्या पायाला गंभीर इजा झाली.
---------
ऑनलाईन धम्म परिषदेचा लाभ घ्या!
बुलडाणा: नांदेड जिल्ह्यातील महाविहार बावरीनगरात २८ आणि २९ जानेवारी रोजी आॅनलाइन धम्म परिषद आयोजित केली आहे. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या परिषदेचा लाभ घेण्याचे आवाहन राजेश शेगावकर यांनी केले आहे.
-------------
कारोना तपासणीला खो!
धाड: परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून येणाºयांची कोरोना तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, धाड आणि परिसरात कोरोना तपासणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.
-------