स्थानिक संत सावतामाळी भवनमध्ये २ सप्टेंबर रोजी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, प्रभारी तहसीलदार खाडे, नायब तहसीलदार वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ व चिखली पोलीस ठाण्याला नव्याने रुजू होणारे पोलीस निरीक्षक अशोक लांडे उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी गणेश मंडळांनी गतवर्षाप्रमाणेच यावर्षीही गणेशोत्सवासंदर्भाने नियमावलींचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन केले. चिखली पोलीस ठाण्याचे मावळते ठाणेदार गुलाबराव वाघ यांचा हृदयसत्कार, तर नव्याने रुजू झालेले ठाणेदार अशोक लांडे यांचे स्वागत यावेळी करण्यात आले. प्रा. अनंत चेके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चिखली पोलीस ठाणे, गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार, आदी उपस्थित होते. बैठकीसाठी गोपनीय शाखेचे बाहेकर, शरद गिरी, कोहेकर काकड, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
ठाणेदार वाघ यांचे कार्य प्रशंसनीय
ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी चिखलीसारख्या मोठ्या पोलीस ठाण्याअंतर्गत सलग तीन वर्षे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतानाच गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यात यश मिळविले आहे. दोन जन्मठेप व एक फाशीची शिक्षा त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांना मिळाली आहे. चिखलीत बंदोबस्तासाठी कधीही येण्याची गरज त्यांच्या कार्यकाळात भासली नाही, अशा शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या कार्याची प्रशंसा यावेळी केली.
ठाणेदार वाघ यांचा वारसा पुढेही कायम राहील
गत तीन वर्षांत ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी आपल्या कामकाजाचा ठसा जनमाणसांत उमटविला आहे. वरिष्ठांनीही आपल्या मनोगतात त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले, ठाणेदार वाघ यांचे काम लक्षात घेऊन त्यांचा वारसा यापुढेही कायम राहील, असा विश्वास देत नव्याने रुजू झालेले ठाणेदार अशोक लांडे यांनी आभार व्यक्त केले.