बुलडाणा: नाफेडमध्ये विकलेल्या तुर, हरभºयाचे चुकारे तातडीने द्या, सन २०१६ मध्ये सोयाबीन उत्पादकांना प्रती क्विंटल घोषीत केलेले अनुदान अद्यापही २६ हजार शेतकºयांना मिळाले नाही, ते अनुदासन वंचित शेतकºयांना ताबडतोब द्या, तसेच कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली. या मागण्या १५ आॅगस्ट पर्यंत मान्य न केल्यास स्वाभिमानी आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. या भेटीत रविकांत तुपकरांनी शेतकºयांच्या व्यथा मांडताना सांगीतले की, मागील २०१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने सोयाबीन या पिकाला बाजारभाव कमी मिळत असल्याने २०० रुपए प्रती क्विंटल अनुदानाची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना यामध्ये बुलडाणा जिल्हयातील जवळपास २६ हजार शेतकरी अजनूही वंचित राहीले आहेत. पावत्या चुकीच्या असल्याच्या कारणावरून शेतकºयांना अपात्र ठरविण्यात आले आहे. खरे तर, या प्रकरणी चुकीच्या पावत्या देणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षीत होते. त्यामुळे या प्रकरणाची पुर्नचौकशी करून वंचित शेतकºयांना अनुदान देण्यात यावे. शासनाने नाफेड अंतर्गत शेतकºयांची तूर व हरभºयाची खरेदी केली, मात्र अद्यप शेतकºयांना तूर व हरभºयाचे चुकारे मिळाले नाहीत. पेरणीच्या काळात शेतकºयांना तूर व हरभºयांचा पैसा कामी येईल, असे वाटत होते. मात्र ऐन पेरणीच्या काळातही हे चुकारे शेतकºयांना मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकºयांना आर्थीक अडचणीचा सामना करावा लागला. दुसरीकडे मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढाला आहे. जिल्ह्यात बोगस बीटीचे बियाणे मोठया प्रमाणावर विक्री झाल्याने शेतकºयांनी याच बीटीची लागवड केली आहे.परिणामी कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. शिवाय सोयाबीनवर उंट अळी तसेच चक्रीभुंगा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी अप्पर रजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वराडे तसेच स्वाभिमानीचे राणा चंद्रशेखर चंदन, पवन देशमुख, एकनाथ पाटील थुट्टे, महेंद्र जाधव, दत्ता जेऊघाले, अमीन खासाब, गजानन पटोकार, आकाश माळोदे, योगेश तुपकर, हरीभाऊ उबरहंडे, प्रदिप तुपकर, अनिल तुपकर, गजानन तुपकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सोयाबीन कपाशीवर आलेल्या रोगांसाठी तातडीने उपाययोजना करा - रविकांत तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:42 PM
कपाशीवर पडलेल्या बोंडअळी व सोयाबीनवर पडलेल्या उंटअळी आणि चक्रीभुंगा रोगावर शासनाने तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निरुपमा डांगे यांची ६ आॅगस्ट रोजी भेट घेवून केली.
ठळक मुद्देया मागण्या १५ आॅगस्ट पर्यंत मान्य न केल्यास स्वाभिमानी आक्रमक आंदोलन करेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. या रोगावर तातडीने शासनाने उपाय योजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.