लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भावाने घेतलेल्या शेतजमिनीची नोंद करून सात-बारा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दुसरबीड येथील तलाठी संजय श्रीराम चव्हाण यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले.दुसरबीड येथील तलाठी कार्यालयाच्या गॅलरीमध्ये लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा कार्यालयात ७ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. त्याच्या आधारावर ८ नोव्हेंबर रोजी पडताळणीत तलाठी संजय श्रीराम चव्हाण यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रत्यक्ष तलाठी कार्यालयाच्या गॅलरीमध्ये दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय चव्हाण यास रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडे खैरव येथीलही अतिरिक्त कार्यभार होता.या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू जवंजाळ, पोलीस नाईक दीपक लेकुरवाळे, पोलीस कॉन्स्टेबल विजय वारूळे, समीर शेख यांनी सहभाग घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक सुनीता नाशिककर, पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केली असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दोन हजारांची लाच घेताना तलाठी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:29 AM
बुलडाणा : भावाने घेतलेल्या शेतजमिनीची नोंद करून सात-बारा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दुसरबीड येथील तलाठी संजय श्रीराम चव्हाण यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले.
ठळक मुद्देबुलडाणा एसीबीची कारवाई