बुलडाणा: जिल्ह्यातील पाणी टंचाईची तीव्रता वाढतच आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सहा गावांसाठी टँकर मंजूर करण्यात आले असून टँकरग्रस्त गावांमध्ये आणखी सहा गावांची भर पडली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील रामनगर येथील ६८० लोकसंख्या व २७५ पशुधनासाठी एक टॅकर मंजूर करण्यात आले आहे. टँकर दररोज १६ हजार ७२५ लिटर्स पाणी पुरवठा करणार आहे. शेगांव तालुक्यातील टाकळी विरो गावातील ७०० लोकसंख्या व ८२३ पशुधनासाठी एक टँकर २२ हजार लिटर्स, भोनगांवच्या ३ हजार ५०० लोकसंख्या व १ हजार २४५ पशुधनासाठी एक टँकर ७५ हजार ४६० लिटर्स, टाकळी हाट येथील १ हजार ८०० लोकसंख्या व ३६१ पशुधनासाठी एक टॅकर २५ हजार लिटर्स पाणी पुरवठा करणार आहे. तरोडा डी गावातील १ हजार ५०० लोकसंख्या व ८०४ पशुधनासाठी एक टँकर दररोज ४८ हजार ५२० लिटर्स आणि एकफळ गावच्या ९०५ लोकसंख्या व ४३५ पशुधनासाठी एक टँकर ९ हजार ८६० लिटर्स पाणी पुरवठा करणार आहे. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेताख या सहा गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे. टँकरवर लावण्यात आलेले जिपीएसचे लॉगीन आयडी व पासवर्ड कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बुलडाणा व संबंधित गटविकास अधिकारी यांना द्यावेत, असे सिंदखेड राजा व खामगांव उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी कळविले आहे.खैरव येथे टँकर मंजूरबुलडाणा : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थितीत पिण्याच्या स्त्रोतापासुन आवश्यक पाणी (दरडोई दरदिवशी २० लिटर्स) उपलब्ध होत नसल्यामुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणुन टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील खैरव या २ हजार ३४४ लोकसंख्या व १ हजार ३०२ पशुधन असलेल्या गावासाठी ६० हजार ७१० ली. टँकरव्दारे पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांमध्ये आणखी सहा गावांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 2:45 PM