ग्रामीण भागातील प्रपत्र ब यादीनुसार लाभार्थ्यांनी स्वत: ची जागा उपलब्ध करून संबंधित गावचे ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा. प्रस्तावासोबत लागणारे आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, मग्रारोहयोचे जॉब कार्ड, राहत्या घराचा फोटो, रेशन कार्ड, राहत्या जागेचा नमुना ८ आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये तत्काळ सादर करावी. संबंधित ग्रामसेवक यांनी परिपूर्ण घरकुलांचे प्रस्ताव पंचायत समिती, बुलडाणा या कार्यालयात सादर करावे. ज्या लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नाही. अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत पंचायत समिती येथे प्रस्ताव सादर करावे. घरकुल मंजुरीकरिता कोणत्याही व्यक्तीस अथवा कर्मचाऱ्यासोबत आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बुलडाणा यांनी केले आहे.
बुलडाणा तालुक्याला ४६४ घरकुलांचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:51 AM