सिंदखेडराजा : गोवर रुबेला (एमआर) लसीकरण मोहिमेच्या सुक्ष्म नियोजनाच्यादृष्टीने तालुकास्तरीय टास्क फोर्स समिती गठीत करण्यात आली आहे. मोहिमेच्या यशस्वितेसाठी समन्वय साधण्याचा हेतू समोर ठेवून या समितीमध्ये सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २०२० पर्यंत गोवर या अत्यंत संक्रमक आणि दरवर्षी देशातील एकूण बालकांपैकी ५० हजार बालमृत्यूस कारणीभूत असणाºया आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलं आहे. त्याला अनुसरुन नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये सिंदखेड राजा तालुक्यात गोवर रुबेला (एमआर) लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. या मोहिमेत ९ महिने ते १५ वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहिम शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे नियोजित मोहिमेच्या सूक्ष्म नियोजनाच्यादृष्टीने तालुकास्तरीय टास्क फोर्स समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी विवेक काळे आहेत. तहसीलदार संतोष कणसे, गटविकास अधिकारी व्ही. एस.जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एस. करपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एल. शिंगाडे, डॉ. ए. एन. बोडके, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. एस.बी.सुरुशे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. एस.जाधव, गटशिक्षणाधिकारी डी. बी. मुसदवाले, बालरोगतज्ञ डॉ. पियुष होलानी, वैद्यकीय व्यावसायिक संघटनेचे डॉ. भिमराव म्हस्के, डॉ.एस. ए. तुपकर, आयुष विभागाचे डॉ. एस. डी. गाणार, दंत शल्यचिकित्सक डॉ. शितल म्हस्के, डॉ.एम. एस. खान, पत्रकार के. डी. मेहेत्रे, पोलिस निरीक्षक बळीराम गिते, बसस्थानक प्रमुख जी. बी.जाधव यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य, सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. उबाळे राहणार आहेत. (तालूका प्रतिनिधी )
'एमआर' लसीकरण मोहिमेसाठी 'टास्क फोर्स' गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:27 IST
सिंदखेडराजा : गोवर रुबेला (एमआर) लसीकरण मोहिमेच्या सुक्ष्म नियोजनाच्यादृष्टीने तालुकास्तरीय टास्क फोर्स समिती गठीत करण्यात आली आहे.
'एमआर' लसीकरण मोहिमेसाठी 'टास्क फोर्स' गठीत
ठळक मुद्देसिंदखेड राजा तालुक्यात गोवर रुबेला (एमआर) लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येणार आहे.मोहिमेच्या सूक्ष्म नियोजनाच्यादृष्टीने तालुकास्तरीय टास्क फोर्स समिती गठीत करण्यात आली आहे.