देऊळगांव मही : शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र असे उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हा परिषद शिक्षकांच्या यंदा प्रशासकीय नियमानुसार बदल्या झाल्या असल्याने जिवनसाथी फाउंडेशनच्यावतीने ‘सन्मान गुरुजंनाचा’ कार्यक्रम पार पडला. यावेळी निरोप देताना शिक्षकांसह विद्यार्थी गहिवरले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले तर प्रमुख अतिथि सरपंच सविता शिंगणे, प्रा.कमेलश खिल्लारे, पर्यवेक्षक राजू चित्ते, अकील काझी, तंटामुक्ती अध्यक्ष संभाजीराजे शिंगणे, माजी सरपंच प्रदीप हिवाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष शिंगणे, डॉ. शिल्पा दंदाले, केंद्रप्रमुख कुमठे, माजी सरपंच रतन रेशवाल, सुभाष शिंगणे, प्राचार्य भूतेकर, प्राचार्य सचिन खरात, प्राचार्य हन्नानखाँ पठाण, रा.कॉ.उपाध्यक्ष रविंद्र इंगळे, सय्यद सईद, ग्रा.पं.सदस्य राजू शिंगणे, अंनथा इंगळे, आकाश पेटकर, शिक्षिका सविता प्रकाश साकला, रंजीत खिल्लारे, टापरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी १० ते १२ वर्ष एकाच शहरात शिक्षणाचे कार्य करणाºया शिक्षकांना निरोप देत असताना शाळेतील शिक्षकासह विद्यार्थी गहवरुन गेले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी केंद्र प्रमुख के.बी.पवार, गणेश पºहाड मुख्याध्यापक रविंद्र जाधव, डि. बी.डोईफोडे, राहुल म्हस्के, मुख्याध्यापक आर.पी.भानुसे, शेख.रफीक, जावेद सर, शिक्षिका कावेरी पडघान, त्रिवेणी शेळके, विजया लगसकर, कावेरी भालके यांचा फेटे बांधून व पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिवनसाथी फाउंडेशनचे विश्वस्त जनार्धन टेकाळे, डॉ. महेश दंदाले, सुनिल मतकर, संतोष जाधव, संजय कोठारी, भगवान इंगळे, संजय शिंगणे, शिवाजी शिंगणे, रविंद्र कुलकर्णी, अमोल बोबडे, शेख.उस्मान, संतोष शिंगणे, अशोक शिंगणे यांनी परिश्रम घेतले.
गुरुजंनाना निरोप देताना शिक्षकांसह विद्यार्थी गहिवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 4:32 PM
देऊळगांव मही : शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र असे उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हा परिषद शिक्षकांच्या यंदा प्रशासकीय नियमानुसार बदल्या झाल्या असल्याने जिवनसाथी फाउंडेशनच्यावतीने ‘सन्मान गुरुजंनाचा’ कार्यक्रम पार पडला.
ठळक मुद्देजिवनसाथी फाउंडेशनच्यावतीने ‘सन्मान गुरुजंनाचा’ कार्यक्रम पार पडला. शिक्षकांना निरोप देत असताना शाळेतील शिक्षकासह विद्यार्थी गहवरुन गेले होते.