खामगाव: शालेय विद्यार्थीनीशी असभ्य वर्तूवणूक करणाऱ्या ५५ वर्षीय शिक्षकाला विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. ही घटना २० जानेवारी रोजी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास मलकापूर येथील कोंडवाडा रोडवर घडली.
विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या मलकापूर येथील शाळेतील एका शिक्षकाने दोन विद्यार्थीनीशी असभ्य वर्तवणूक करीत त्या विद्यार्थीनीला जाती संदर्भात विचारणा करुन लागट करण्याचा प्रकार केला. हा किळसवाणा प्रकार त्या विद्यार्थीनी आपल्या घरच्या मंडळींना कथन केला. तर ही बाब विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यक़र्त्यांना कळताच त्यांनी थेट त्या शाळेवर धडक देत त्या शिक्षकाला त्याच्या कृत्याबद्दल जाब विचारुन शाळेच्या गेटबाहेर काढीत चांगलाच चोप दिला. याच परिस्थितीत त्या शिक्षकाला मुख्याध्यापकांच्या स्वाधिन करीत या शिक्षकावर कार्यवाही करा अशी लेखी स्वरुपात मागणी करण्यात आली. यावेळी विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा गौरक्षा प्रमुख मोहनसिंग राजपूत, जिल्हा सहमंत्री श्रीकृष्ण तायडे, बजरंगदलाचे तालुका अध्यक्ष दिपक कपले, भुषण बोरसे, संदीप काचकुटे, रुपेश सोनोने, पियुश बोरसे, राजेश जामोदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.