- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यातील खासगी अनुदानीत शाळांमधील शिक्षक समायोजनाची प्रक्रिया गत दोन महिन्यापूर्वी राबविण्यात आली होती. मात्र याप्रक्रियेतील १२ शिक्षक अद्यापही शाळेवर रुजू न झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही शिक्षकांना सोयीची शाळा हवी आहे तर काही ठिकाणी संस्थेकडूनच शिक्षकांना रुजू करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत होणाºया शिक्षक समायोजनाचे घोडे अडले आहे. पटपडताळणीनंतर विद्यार्थी व शिक्षक गुणोत्तर तपासून कमी विद्यार्थी व जास्त शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात येतात. तर रिक्त झालेल्या ठिकाणी शिक्षकांचे समायोजन करण्यात येते. संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा मार्ग अनेक दिवसांपासून प्रलंबीत होता. मात्र या संदर्भात ग्रामविकास विभागाने खासगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश मागील वर्षी दिले होते. यामुळे राज्यातील बहुतांश शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात खासगी अनुदानीत संस्थावर सुद्धा १०२ पदे रिक्त होते. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून नोव्हेंबरमध्ये शिक्षक समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील खासगी अनुदानीत शाळांमध्ये ५२ शिक्षकांचे समायोजन २८ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आले. परंतू यामध्ये १२ शिक्षक अद्यापही शाळेवर रुजू झाले नाही. काही शिक्षक सोयीस्कर शाळा पाहिजे, म्हणून दिलेल्या शाळेवर रुजू होत नाहीत. तर काही ठिकाणी विषय नसणे, संस्थाध्यक्ष शाळेवर रुजू करू घेण्यास टाळाटाळ यासारख्या विविध कारणांमुळे समायोजनाच्या या प्रक्रियेत व्यत्यय येत आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी पानझाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
वेतन रखडलेशिक्षक समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होऊनही काही शिक्षक संबंधीत शाळांवर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे वेतन कसे काढावे, असा प्रश्न उपस्थित होते आहे. त्यामुळे समायोजनाच्या प्रक्रियेसह अशा शिक्षकांच्या वेतनाचाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शिक्षकांच्या कार्यालयात वाºयासंस्थाचालक रुजू करून घेत नाहीत, किंवा सोयीच्या ठिकाणी शाळा पाहिजे, यासाठी अनेक शिक्षक दररोज माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वाºया करत आहेत. त्यामुळे समायोजन प्रक्रियेअंतर्गत त्यांना दिलेल्या शाळेचा पदभारही काही शिक्षकांनी घेतला नाही.
आॅफलाइन प्रक्रिया आॅनलाइनच्या काळातही शिक्षक समायोजनाची प्रक्रिया आॅफलाइन झाल्याचे दिसून येते. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत खासगी अनुदानीत शिक्षक समायोजन प्रक्रिया आॅफलाइन करण्यात आली आहे. मात्र यापुढे सर्व प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे होणार असल्याने अशा अडचणी येणार नाहीत, असे संकेत आहेत.