मेहकर : खेळामधून व्यक्तीचा सांघिक विकास होत असल्यामुळे व मैत्रीची भावना यामधूनच वाढीस लागत असल्याने माणसाच्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने सांघिक व वैयक्तिक खेळ खेळावेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. सुमित सरदार यांनी व्यक्त केले .
मेहकर शहरामध्ये कॉटन मार्केटच्या शेजारील मैदानात क्रिकेटचे सामन्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन ॲड. साहेबराव सरदार यांच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहकर तालुका अध्यक्ष गजानन सावंत, जिल्हा उपाध्यक्ष गिरधर पाटील ठाकरे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. बारा दिवस चाललेल्या या सामन्यांमध्ये मेहकर शहरातील व पंचक्रोशीतील अनेक खेळाडूंनी आपल्या संघामार्फत सहभाग नोंदविला होता
या सामन्यांमध्ये बजरंग क्रिकेट क्लब यांनी प्रथम क्रमांक पटकावित अकरा हजार रुपयांचे बक्षीस प्राप्त केले तर माही क्रिकेट क्लब यांनी द्वितीय क्रमांक पटकावून सात हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. तसेच रामदेव बाबा क्रिकेट क्लब व संघर्ष क्रिकेट क्लब यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ बक्षीस प्राप्त केले. बक्षीस वितरण ॲड. सुमित सरदार यांच्या अध्यक्षतेखाली तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गजानन सावंत, सुधाकर हिवाळे, प्रवीण गायकवाड, मंजुळकर अण्णा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या क्रिकेट सामन्यांच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मुक्तार टेलर, सुमित देबाजे, सचिन जाधव, हमीद बागवान, ज्ञानेश्वर माने, समीर खान, संकेत कटारे, रवींद्र बाजड, सोनू खटावकर, पप्पू पंडित, रामा शिंगणे, कुंदन देबाजे आदींनी परिश्रम घेतले.