शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कोवीड समर्पीत रुग्णालयात टेलीमेडीसीन सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:25 PM

कोवीड-१९ रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

बुलडाणा : येथील कोवीड समर्पीत रुग्णालयात टेलीमेडीसीन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे बुलडाण्यातील गंभीर रुग्णांवर प्रसंगी उपचार करण्यासाठी विदेशासह, पुण्या, मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संवाद साधून उपाचर करणे शक्य होणार आहे.सुमारे चार कोटी रुपये खर्च करून बुलडाण्यातील स्त्री रुग्णालायात उभारण्यात आलेल्या कोवीड-१९ रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यातंर्गतच ही सुविधा येथे देण्यात आली आहे. कोवीड समपीत रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १० आॅगस्ट रोजी ई-लोकार्पण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली.विशेष म्हणजे कोवीड रुग्णालयामध्ये कार्यरत डॉक्टरांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पीपीई कीट घालण्यासाठीही स्वतंत्र कक्ष देण्यात आले आहे.रुग्णालयाचा स्वतंत्र फिल्टरप्लॅन्ट असून, रुग्णालयातील संपूर्ण १०० बेड हे सेंट्रल आॅक्सीजन सुविधा युक्त आहेत. या व्यतिरिक्त २० बेडचे आयसीयू युनीट उभारण्यात आलेले आहे. कोरोना रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आॅक्सीजन युनीट येथे असल्याने गंभीर रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. यासाठी तब्बल ३२ जंबो आॅक्सीजन सिलींडर, येथे उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच कार्डियाक बेड्स, मॉनिटर्स सुविधा ही येथे उपलब्ध करण्यात आला आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमत्री ्अजीत पवार हे मुंबईतूनच या रुग्णालयाचे दुपारी साडेबाराच्या सुमारास २ई-लोकार्पण करणार असून तशी घोषणा त्यांनी केल्यानंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे या रुग्णालयाचे औपचारिकरित्या फित कापून लोकार्पण झाल्याचे जाहीर करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रारंभी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एक छोटेखानी कार्यक्रम होणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या