तर दुबार पेरणी
खरीप हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची पुढील सर्व आर्थिक गणिते अवलंबून असतात. दरम्यान, यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, कापूस यासह इतर खरीप हंगामातील पिकांचा पेरा झाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोयाबीनचा पेरा वाढला
दरवर्षी जिल्ह्यात खर्चाच्या तुलनेत भाव कमी मिळत असल्यामुळे कापसाचे क्षेत्र घटले आहे. तर सोयाबीनचा पेरा वाढला आहे. यावर्षी कापूस १ लाख ३१ हजार १७६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तर, सोयाबीन २ लाख ७२ हजार २८ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६५ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. सध्या दुबार पेरणीची शेतकऱ्यांनी घाई करू नये. आणखी आठ दिवसांत पाऊस झाला तर पिके जगू शकतात. ज्या शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे, त्यांनी घाई न करता जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणी करावी.
- नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.
देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो?
मागील वर्षी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आल्यामुळे दुबार पेरणीचा खर्च वाढला होता. त्याच पद्धतीने जर यावर्षी देखील दुबार पेरणीचे संकट आमच्यावर आले तर आर्थिक संकट येणार आहे. तसे आल्यास शासनाकडून रेशनप्रमाणे खते आणि बियाणे मोफत द्यावीत.
शत्रुघ्न देशमुख, शेतकरी.
पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे परिसरातील काही शेतकऱ्यांनी तर दुबार पेरणी केली आहे.
हरिदास खांडेभराड, शेतकरी.
जिल्ह्यातील सध्याची स्थिती
सर्वसाधारण पर्जन्यमान - ७६१.७ मिलीमीटर
प्रत्यक्ष झालेला पाऊस - १३९ मिलीमीटर सरासरी
आतापर्यंत झालेली पेरणी - ४८७८७७.८० हेक्टर
कोणत्या तालुक्यात किती पाऊस/पेरणी
तालुका पाऊस (मि.मी.) पेरणी (हेक्टरमध्ये)
बुलडाणा १३६.३ २८८९०
चिखली २५०.८ ७५५२०.२०
देऊळगाव राजा १९४.४ १४३४६
सिंदखेड राजा २५०.९ ५५२५३
लोणार १५१.४ ४४८१८.२०
मेहकर २६३.५ ७५१९१.३०
खामगाव १५५.९ ६३१९८.४०
शेगाव ३२.२
मलकापूर ६९.७
नांदूरा ७४.९
मोताळा ११३.४
संग्रामपूर ११५.५
जळगाव जा. ४३.६