- भगवान वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गाव ते गाव आणि जिल्हा ते जिल्हा कनेक्ट करणाऱ्या रस्त्यांवरील जीर्ण झालेल्या पुलांमुळे वाहतुकीस अडथळा येत होता. आता मात्र, हा अडथळा दूर होणार असून, जिल्ह्यातील तब्बल दहा पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांच्या बांधकामासाठी मंजुरात मिळाली असून, दहा टक्के निधीही प्राप्त झाला आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात जिल्ह्यात दहा पूल नव्याने उभे राहणार आहेत.सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलडाणाअंतर्गंत नाबार्ड कर्ज सहाय्य योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील दहा प्रमुख जिल्हा मार्गांवरील दहा पुलांचे बांधकाम रखडले होते. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, जिल्ह्यातील नेत्यांनी शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता या पुलांच्या निर्माणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यातील तब्बल दहा पुलांच्या बांधकामामुळे गाव ते गाव आणि जिल्हा ते जिल्हा कनेक्ट होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या पुलांच्या निर्माण कार्यासाठी दहा टक्के निधीही प्राप्त झाला आहे.दरम्यान बुलडाणा जिल्ह्याचा रस्त्यांचा मोठा अनुषेश आहे. ग्रामीण रस्त्यांचीही खस्ता हालत आहे. ही कामे झाल्यास मोठा दिलासा मिळेल.
महिनाभरात कामाला होणार सुरूवातn या पुलांच्या बांधकामासाठी नाबार्ड कर्ज सहाय्य योजनेंतर्गंत दहा टक्के निधी प्राप्त झाला आहे. या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली असून, येत्या महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.
केंद्रीय मार्ग निधीतून रस्तेही लखलखणारn नाबार्ड योजनेंतर्गंत दहा पुलांच्या बांधकामांना मंजुरात मिळाली असतानाच केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत जिल्ह्यातील राहेरीजवळील रस्त्यावरील मोठ्या पुलाचे बांधकाम आणि ११ रस्त्यांच्या दुरुस्तीसह या निधी योजनेंतर्गत आणखी दहा पुलांच्या बांधकामाला मंजुरात मिळाली आहे. तर काही रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्तीकरण करण्यात येणार आहे. या कामांना मंजुरात मिळाली असून, लवकरच निधी प्राप्त होणार असल्याची माहिती आहे.