लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पेट्रोलिंग करीत असताना चौकशी करणार्या पोलिसांवर चाकू हल्ला करणार्या तीन आरोपींना १0 वर्षांचा सo्रम कारावास व ५ हजार तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम सत्र न्यायाधीशांनी १0 ऑक्टोबर रोजी सुनावली. बुलडाणा तालुक्यातील सैलानी ट्रस्ट इमारतीजवळ पोलीस कॉन्टेबल वासुदेव खराटे व o्रीराम व्यवहारे यांना सकाळी पेट्रोलिंग करीत असताना २७ सप्टेंबर २0१२ रोजी आरोपी आनंद चंद्रभान पवार, किशोर ऊर्फ सोनू भोसले तसेच विजय सोनू भोसले हे संशयितरीत्या विनानंबर दुचाकीसोबत निदर्शनास पडले. त्यांच्याकडे दुचाकीची कागदपत्रे नसल्याने चेकिंग मेमोवर सही करण्यासाठी सांगितले असता तिघांनी सही करण्यास नकार दिला व पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी o्रीराम व्यवहारे यांच्याशी वाद घातला. त्यामुळे o्रीराम व्यवहारे यांनी आरोपी आनंद पवार व किशोर भोसले यांना पकडले. त्यानंतर आनंदा पवार याने त्याच्या जवळील चाकू o्रीराम व्यवहारे यांचे पोटात खुपसला व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. झटापटीत आरो पी यांनी दोन्ही पोलिसांच्या हातून निसटून पळून गेले. त्यानंतर जखमी अवस्थेत o्रीराम व्यवहारे यांना शिवाजी रिंढे व यांचे ऑटोरिक्षात दवाखान्यात बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर घटनेची तक्रार वासुदेव खराटे यांनी दिल्यानंतर तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सरकार पक्षाने सदर प्रकरणात १७ साक्ष- पुरावे तपासले. सर्व साक्षीदारांचे साक्ष-पुरावे झाल्यानंतर विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस. तिवारी यांनी आरोपींनी १0 वर्ष सo्रम कारावास व रुपये ५ हजार दंड तसेच कलम ३३३, ३४ भादंविनुसार तीनही आरोपींना १0 वर्ष सo्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. -
पोलिसांवर हल्ला करणार्यांना दहा वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:15 AM
बुलडाणा: पेट्रोलिंग करीत असताना चौकशी करणार्या पोलिसांवर चाकू हल्ला करणार्या तीन आरोपींना १0 वर्षांचा सo्रम कारावास व ५ हजार तसेच २ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम सत्र न्यायाधीशांनी १0 ऑक्टोबर रोजी सुनावली.
ठळक मुद्देचौकशी करणार्या पोलिसांवर आरोपींनी केला होता चाकू हल्लातीन आरोपींना १0 वर्षांचा सo्रम कारावास व दंड