लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रांवरच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये यांच्यावर परीक्षेबाबत काय निर्णय होणार याची टांगती तलवार विद्यार्थ्यांवर होती. परंतु आता दहावी, बारावीच्या परीक्षा या ऑफलाइन होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. बोर्ड ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी अनुकूल नसल्याने ऑफलाइनच परीक्षा होणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना आता मुलांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे मुलांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे.
दहावी म्हणजे उच्च शिक्षणाचा पाया. वर्ष भर शाळा बंद होत्या. मुलांचा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने झाला. पण आता परीक्षा ऑफलाइन होणार ऑफलाइन परीक्षा घेणे धोक्याचे आहे. -वैभव मिनासे, पालक
ऑनलाईन परीक्षेसाठी वस्तूनिष्ठा असेल तिथे विद्यार्थ्याला त्याचे मत मांडायला वेळ मिळणार नाही. त्याचे मूल्यमापन योग्य होणार नाही. यापूर्वी परीक्षेचे स्वरूप ऑफलाईनच आहे. यावेळी विशेष खबरदारी घ्यावी. - उर्मिला धोंडगे.