परीक्षेचे वेळापत्रक
दहावीची परीक्षा-२९ एप्रिल ते २० मे
बारावीची लेखीपरीक्षा-२३ एप्रिल ते २१ मे
विद्यार्थी संख्या
दहावी - ४५०६८
बारावी - ३२१०८
दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?
दहावी म्हणजे उच्च शिक्षणाचा पाया. वर्ष भर शाळा बंद होत्या. मुलांचा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने झाला. पण आता परीक्षा मात्र ऑफलाइन होणार आहेत. सरकारच्या या ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीबद्दल अंशतः आक्षेप आहेच. पण त्याहीपेक्षा कोरोना प्रादुर्भावाची चिंता अधिक आहे. या काळात ऑफलाइन परीक्षा घेणे धोक्याचे आहे.
वैभव मिनासे, पालक
माझी मुलगी दहावीला आहे. तिच्या ऑफलाइन परीक्षेची चिंता आहे. सरकार आणि परीक्षा बोर्डाने हे टाळायला हवे. कोरोना संसर्ग झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? ऑफलाइनला पर्याय दिला जावा. जेणेकरून मुलांबद्दल असलेली पालकांची चिंता दूर होईल. दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलांना परीक्षेचा ताण त्यात कोरोनाची भीती.
प्रवीण झाल्टे, पालक
बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?
माझी मुलगी बारावीला आहे. ऑफलाइन परीक्षा होणार असल्याने आणि राज्यात कोरोना वाढत असल्याने चिंता वाटते. परीक्षा केंद्रावर मुले एकत्रित येणार म्हटल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार, घरात, वृद्ध मंडळी, लहान मूल आहेत. त्यामुळे अधिक चिंता आहे. ऑफलाइन परीक्षेला दुसरा पर्याय दिला जावा.
जयश्री वाघमारे, पालक
मुलांच्या भविष्यापेक्षा त्यांच्या आरोग्याची चिंता अधिक वाटत आहे. बारावीची परीक्षा ऑफलाइन होणार असल्याने या चिंतेत अधिक भर पडली आहे. सरकार एकीकडे लॉकडाऊन लावण्याच्या मानसिकतेत आहे आणि महत्त्वाचा टप्पा असलेल्या परीक्षा आणि त्याही कोरोना काळात ऑफलाइन होत आहेत.
शहाजी चौधरी, पालक