शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर लोणार सराेवराच्या विकासाची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 12:16 PM

Uddhav Thackrey at Lonar लोणार सरोवराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : पौराणिक, वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या लोणार सरोवराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पाहणी केली. सोबतच लोणार सरोवर विकास आराखड्याची स्थानिकांचे प्रश्न समजावून घेऊन तथा सहकार्याने प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोणारमध्ये आगमन झाल्यानंतर  त्यांनी सरोवर काठावरील वनकुटी व्ह्यू पाॅईंटवरून पाहणी केली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली. दरम्यान, रणथंबोरच्या धर्तीवर लोणार सरोवर परिसराचा विकास होऊ शकतो का, याचीही चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि. प. अध्यक्ष मनीषा पवार, खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, दिलीपकुमार सानंदा, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत यांच्यासह  पुरातत्त्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे लोणार सरोवराचा विकास करताना नेमका कोणत्या पद्धतीने करावा, याचा विचार एकत्रितरीत्या करण्यात यावा. सरोवर परिसरात मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे या ठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची  वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा.

 धारतीर्थ विकासाबाबत सूचना धारतीर्थ परिसराची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी परिसर विकासाबाबत सूचनाही दिल्या. येथील जमिनीचे सपाटीकरण करून लॅण्डस्केप विकसित करावे ते मानवनिर्मित वाटू नये याची काळजी घेत नैसर्गिक टच दिला जावा. सौंदर्यीकरण करून शोभेची झाडे लावण्यात यावीत. परिसराच्या विकासासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे असे पाहणीही दरम्यान त्यांनी सांगितले. त्यानंतर दैत्यसूदन मंदिराला त्यांनी भेट दिली.  दैत्यसूदन मंदिरात आत जात मुख्यमंत्र्यांनी येथील ऐतिहासिक शिल्पाविषयी माहिती घेतली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसोबत छायाचित्रण केले. कोरीव कामांचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढले. यावेळी लोणार सरोवराचे अभ्यासक स्व. सुधाकर बुगदाने यांच्या स्नुषा शैलेजा श्रीपाद बुगदाने व शुभदा स्वप्नील बुगदाने यांनी स्व. सुधाकर बुगदाने लिखित लोणार सरोवर हे पुस्तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेlonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा