वाशिम, दि. २४- मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी मधुकर ठाकरे यांच्या २५ एकर जमिनीचे तहसीलमधील अभिलेख कक्षातील मूळ ह्यरेकॉर्डह्णमध्ये बनावट दस्तावेज बनविण्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित शेतकर्याने जिल्हाधिकार्यांकडे सोमवारी धाव घेऊन दुरुस्तीची मागणी केली आहे. शेतकरी ठाकरे यांनी याबाबत नमूद केले आहे की, नांदगाव येथे आमची वडिलोपार्जित जमीन आहे. त्या जमिनीचे मंगरुळपीर तहसील कार्यालयातील ह्यरेकॉर्ड रुमह्णमध्ये जमा असलेल्या फेरफार, सात-बारा, हक्क नोंदणी यामध्ये खाडाखोड करून जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
मूळ जमिनीचे बनविले बनावट दस्तावेज!
By admin | Published: October 25, 2016 2:14 AM