शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

तलाठ्यांचे उघड्यावर कार्यालय थाटून आंदोलन

By admin | Published: July 01, 2017 12:24 AM

लक्ष वेधण्यासाठी चिखली तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी ३० जून रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात उघड्यावर बसून कार्यालयीन काम केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे बुलडाणा जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांचे भाडे सन २०१२ पासून देण्यात आले नाही. त्यामुळे याचा आर्थिक बोझा तलाठ्यांना सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी चिखली तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी ३० जून रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात उघड्यावर बसून कार्यालयीन काम केले.शासनाने ५ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेले तलाठी कार्यालयाचे भाडे तलाठ्यांना नियमित मिळत नसल्याने संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे ४ कोटी रूपयांच्या आसपास तलाठी कार्यालयांचे भाडे थकलेले आहे. याची दखल घेवून तातडीने या समस्येचा निपटारा करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा विदर्भ पटवारी संघाच्यावतीने देण्यात आला आहे. तत्पूर्वी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी चिखली तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी आपले संपूर्ण दप्तर घेवून तहसील आवारात उघड्यावर वसून काम केले. दरम्यान या आंदोलनास माजी आमदार रेखाताई खेडेकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर, अशोक डुकरे, सुरेशआप्पा खबुतरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, बाजार समितीचे सभपती डॉ.सत्येंद्र भुसारी, संजय पांढरे, ओमप्रकाश भुतेकर, गजानन वायाळ, समाधान सुपेकर, रवि डाळीमकर, बाळासाहेब पवार, ज्ञानेश्वर सुरूशे यांनी भेट दिली. या आंदोलनात पटवारी संघाचे विदर्भाध्यक्ष मनोज दांडगे, जिल्हा सचिव रमाकांत माकोने, शशिकांत वानखेडे, उपविभाग अध्यक्ष संजय डुकरे पाटील, विजय बोराखडे, उपाध्यक्ष सुधाकर गिरे, तालुकाध्यक्ष संतोष राठोड, सचिव अनिल जाधव, उपाध्यक्ष परसराम सोळंकी, सुनिल डव्हळे, विकास कस्तुरे आदी पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील सर्व तलाठी सहभागी झाले होते. दरम्यान या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास जिल्हाभरातील तलाठी १ आॅगस्ट महसूल दिनावर बहिष्कार टाकून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडतील असा ईशारा यावेळी मनोज दांडगे यांनी दिला.