शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
4
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
5
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
6
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
7
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
8
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
9
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
10
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
11
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
12
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
13
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
14
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
16
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
17
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
18
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
19
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
20
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष

राजुर घाटात बस उलटली, सुदैवाने प्राणहानी टळली

By संदीप वानखेडे | Published: July 25, 2023 6:51 PM

ही बस मलकापूर येथून बुलढाणाकडे (बस क्रमांक एमएच ०६ एस ८३७५) येत हाेती.

बुलढाणा : ब्रेक निकामी झाल्याने मलकापूर येथून बुलढाणा शहरात येणारी बस राजूर घाटात उलटली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने या अपघातात सात प्रवासी किरकाेळ जखमी झाले. ही घटना दि. २५ जुलै राेजी दुपारी घडली.

ही बस मलकापूर येथून बुलढाणाकडे (बस क्रमांक एमएच ०६ एस ८३७५) येत हाेती. दरम्यान, राजूर घाटात चालकाकडून गेअर बदलताना बस न्यूटन झाली़ उतार असल्याने ही बस रिव्हर्स झाली. काही अंतरावर गेल्याने बस उलटली. या अपघातात महादेव ताेताराम दाभाडे (रा. उमरा), सबरू संघा सगाेरा (रा. तराेडा), शे. रफीक शे. अनीस रा. राजूर, आशाबाई सूर्यासिंग भाेकन (रा. तराेडा), समशाद बिलाल शे. बिलाल (रा. काेथळी), विठ्ठल रामसिंग धाेती (रा. तराेडा), मेशसिंग रामधन बिरबस्सी आदी किरकाेळ जखमी झाले. या प्रवाशांवर उपचार केल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली.मदतीसाठी सरसावले हातअपघाताची माहिती मिळताच युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, श्रीकांत गायकवाड, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, शुभम दांडगे, करण हिवाले, विकी राऊत आदींसह इतरांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले.भंगार बसेसचा प्रश्न ऐरणीवरजिल्ह्यातील सर्वच आगारांमध्ये भंगार झालेल्या बसेसची संख्या वाढली आहे. त्यातच लांब पल्ल्यासाठी या भंगार बसेस लावण्यात येतात. त्यामुळे अनेक वेळा बस बाेथा आणि राजूर घाटातून चढताना बंद पडतात. त्यामुळे, प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागताे. 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणाpassengerप्रवासी