लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:- गणेश विसर्जनादरम्यान आदिवासी ग्राम शिवणी येथील तलावात एक यूवक बूडाल्याची दुर्दैवी घटना गूरूवारी दूपारी ३ वाजता दरम्यान घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. बूडालेल्या यूवकाचा मुतदेह तब्बल २५ तासांनी सापडला आहे. संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील ४० वर्षीय सिद्धार्थ प्रकाश खरगे गूरूवारी दूपारी ३ वाजता दरम्यान शिवणी येथील तलावात बूडाला. युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी बूलढाणा येथील राज्य आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता पासून राज्य आपत्ती निवारण पथकाने यूध्दपातळीवर शोध मोहीम राबवली. अखेर साडेसात तासांनी दूपारी साडेचार वाजता दरम्यान पथकाला मुतदेह बाहेर काढण्यात यश आले. याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात अकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धटना स्थळावर तामगाव ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसह संग्रामपूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे उपस्थित होते. सातपूडा पर्वत रांगेतील आदिवासी दुर्गम भागात शिवणी गावालगत सदर तलाव आहे. हा तलाव पूर्ण भरलेला असून यामध्ये समूद्र सपाटी पासून ५० ते ६० फूटापर्यंत जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती आहे.
वान नदी पात्रात बूडून एकाचा अंत
संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा बु. येथे गणेश विसर्जन दरम्यान वान नदी पात्रात बूडून एका ४२ वर्षीय इसमाचा मूत्यू झाला आहे. हि धटना शूक्रवारी दूपारी साडेतीन वाजता दरम्यान घडली आहे. अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव राणेगाव येथील रविंद्र रामराव जंवजाळ हा इसम गणेश विसर्जनासाठी संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा बु. येथील वान नदी पात्रात उतरला. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा वान नदीपात्रात बूडून मूत्यू झाला आहे. याप्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात अकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.