शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
काँग्रेस निवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा पोटनिवडणूक एकटी लढण्याची शक्यता
3
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
4
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
5
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
6
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
7
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
8
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
9
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
10
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
11
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार
12
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
13
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
14
Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स
15
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
16
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
17
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
18
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
19
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन
20
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी

बस चालवायचे साेडून चालकाने काढली प्रवासी महिलेची छेड, विनयभंगाचा गुन्हा दाखल

By संदीप वानखेडे | Published: March 13, 2023 6:16 PM

वाशिमवरून पुणे येथे प्रवासी करणाऱ्या खासगी बस क्र. एमएच ०४ जीपी १२८८ ही रविवारी संध्याकाळी निघाली हाेती.

सुलतानपूर : रात्रीचा प्रवास आणि ताेही खासगी बसने एकट्या दुकट्या महिलेला किती घातक ठरू शकताे, हे १२ मार्च राेजी वाशिम ते पुणे जाणाऱ्या एका खासगी बसमधील प्रसंगावरून अधाेरेखीत हाेत आहे़ कारण वाशिमवरून पुणे जाताना एका महिलेची त्या बसच्या चालकाने वाहन चालवणे साेडून चक्क छेड काढली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून त्या बस चालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यावेळी गर्दीचा फायदा घेत चालक फरार झाला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून मेहकर पाेलिसांनी आराेपी खासगी बसचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

वाशिमवरून पुणे येथे प्रवासी करणाऱ्या खासगी बस क्र. एमएच ०४ जीपी १२८८ ही रविवारी संध्याकाळी निघाली हाेती. यामध्ये वाशिम जिल्ह्यातीलच एका गावातील २६ वर्षीय महिला पुणे येथे जाण्यासाठी या बसमध्ये बसली हाेती. दरम्यान, रिसाेडच्या समाेर आल्यानंतर खासगी बसचालक आसीफ शे बागा (वय ३०, रा. व्याड, जि. वाशिम) याने महिलेबराेबर लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने धास्तावलेल्या महिलेने हा प्रकार आपल्या नातेवाइकांना कळविला. त्यामुळे रात्री १०:१५ वाजता पीडितेच्या नातेवाइकांनी ही बस सुलतानपूर येथे थांबवून चालकाला जाब विचारला. त्यामुळे तेथे माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती. या प्रकाराबाबत माहिती मिळताच मेहकरचे पाेलिस उपनिरीक्षक पवार, पाे.काॅ. राजेश जाधव यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यातच गर्दीचा फायदा घेत आराेपी खासगी बसचालक फरार झाला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मेहकर पाेलिसांनी खासगी बसचालक आसीफ शे. बागा याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून रिसोड (जि. वाशिम) पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.

प्रवाशांना मनस्ताप

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे खासगी बसमधील प्रवासी प्रचंड धास्तावले हाेते. दोन दिवसांची सुटी आटोपून अनेकांना वेळेत पोहोचायचे होते, तर काही विद्यार्थी परीक्षेसाठी रात्रीचा प्रवास करून सकाळी लवकरच पाेहोचण्याच्या नियाेजनाने बसमध्ये बसले हाेते. मात्र, या अनपेक्षित प्रकारामुळे त्यांना दाेन तास ताटकळत बसावे लागले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

टॅग्स :buldhanaबुलडाणा