भेंडवळ-
सातेतीनशे वर्षांची परंपार असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवडची घटमांडणी पार पडली. यामध्ये घटमांडणीचे भाकित आज जाहीर करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवडच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवड घटमांडणीनुसार यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचं सांगितलं आहे.सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवडच्या घट मांडणीचे निष्कर्ष आज सकाळी जाहीर झाले आहेत. यात देशावरील संकटाच्याबाबतीत महत्वाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. देशाच्या प्रधानावर आर्थिक संकट येणार असल्याचं भाकित करण्यात आलं आहे. देशाच्या संरक्षण खात्यावर दबाव, ताण राहणार आहे. देशात घुसखोरीचा प्रभाव कायम राहणार आहे. राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल, असं नमूद करण्यात आलं आहे. देशाच्या राजासमोर संकटं आली तरी राजाची गादी कायम राहणार असल्याचंही भाकित वर्तविण्यात आलं आहे.
काय आहे भेंडवडची भविष्यवाणी?पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवडमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं.
भेंडवडच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला 350 वर्षांची परंपरा आहे. ही घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खान्देश या ठिकाणाहून विविध शेतकरी येतात. अक्षय्य तृतीये च्या दुसऱ्या दिवशी हे भाकित सांगितलं जातं. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत.
सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकित व्यक्त केलं आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा खूप विश्वास आहे.
जून-जुलैमध्ये साधारण पाऊस आणि सप्टेंबरमध्ये जास्त पाऊसजून आणि जुले महिन्यात साधारण पाऊस पडेल ऑगस्ट महिन्यात चांगला तर सप्टेंबर महिन्यात जास्त होईलविशेष म्हणजे अवकाळी पाऊस ही राहणार आहे. वार्षिक पीक परिस्थितीचे भाकीत - तूर चांगले पीक या वर्षात तूर हे सर्वात चांगले येणारे पीक असेल तर कपाशीचे पीक हे कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील. अतिवृष्टी आणि जास्त पावसामुळे ज्वारीचे पीक साधारण असून या पिकांची नासधूस होण्याची शक्यता जास्त आहे.
मुगाचे पीक सुद्धा साधारण असून उडदाचे पीक साधारण राहील आणि या पिकाची सुद्धा नासाडी वर्तवण्यात आली आहे.तीळाला तेजी - तीळ हे तेलवा नसून तेलवर्गीय पीक असून त्याचे भाव साधारण राहतील भादली हे पिक रोगराईचे प्रतीक आहे ह्या वर्षात रोगराईचे प्रमाण अधिक असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा साधारण बाजरीचे पीक चांगले राहील मटकी पण साधारण राहील साडी म्हणजे तांदळाचे साधारण चांगले असेल.