अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, (खामगाव, जि. बुलढाणा): मोठी घटना चोरी करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या आणि स्थानिक गुन्हे शाखेने शेगावातून ताब्यात घेतलेल्या छर्रा गँगमधील तिघांना खामगाव येथील न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली. छर्रा गँगमधील तिघांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने न्यायालयात हजर केले. त्यावेळी खामगाव येथील प्रथम वर्ग कोर्ट क्रमांक ३ चे न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. राजुरकर यांनी हा आदेश दिला.
खामगाव येथील गांधी चौकातून एका दुचाकीच्या डिक्कीतून साडेसहा लाखांची बॅग लंपास करणाऱ्या गुजरातमधील एका गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केला. तपासाच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव-बाळापूर रोडवरील एका शेतात दरोड्याचा कट रचत असलेल्या या टोळीतील तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्या ताब्यातून एका आलिशान कारसह, एक दुचाकी आणि दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या तिघांना शनिवारी खामगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तसेच तांत्रिक तपासासाठी तिनही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सहा. पोलीस निरिक्षक राहुल जंजाळ आणि सहकार्यांनी छर्रा टोळीतील तीघांना न्यायालयात हजर केले. सुनावनी दरम्यान न्यायदंडाधिकार्यांनी संबंधितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.चौकट...
सात सदस्यांचा शोधघटनास्थळावरून पळ काढणार्या सात जणांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत आहे. कोठडीत आरोपींच्या माध्यमातून स्थानिक गुन्हेशाखेकडून सराईत आरोपीपर्यंत पोहचण्याचे एलसीबीचे प्रयत्न असल्याचे समजते.