शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

बियरबारमध्ये चोरी; चोरट्यास आवरता आला नाही मद्यप्राशनाचा मोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:29 AM

Buldhana Crime News विदेशी दारू बॅगमध्ये भरल्यानंतर तेथेच  पेग घेण्याचा मोहही चोरट्यास आवरता आला नाही.

ठळक मुद्देसंपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तब्बल १ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड :  येथील एका बियरबारमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख ३९ हजार रुपये किमतीची दारू चोरी केल्याची घटना ११ डिसेंबर राजी उघडकीस आली. विशेष म्हणजे या बियरबारमधील किमती विदेशी दारू बॅगमध्ये भरल्यानंतर तेथेच  पेग घेण्याचा मोहही चोरट्यास आवरता आला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बुलडाणा-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाड गावापासून एक किलोमीटर अंतरावर राजेश आसाराम मालवे  यांचा बियरबार आहे. १० डिसेंबरला येथील कामकाज आटोपल्यानंतर ते व तेथील नोकर हे घरी निघून गेले होते. दरम्यान, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बियरबारची सिमेंट व लाकडी दरवाजाच्या कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. सोबतच हॉटेलच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या नामांकित कंपनीची विदेशी दारू बॅगमध्ये भरली. त्यानंतर आपला मोर्चा गुदामाकडे वळवून दोन्ही ठिकाणांवरून तब्बल १ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. या चोरीदरम्यान बियरबारमध्येच एका चोरट्याने पेग मारला. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याने त्यात हे उघड झाले. राजेश मालवे यांनी पोलिसात तक्रार दिली.

चोरटे ‘’सीसी’’ कॅमेऱ्यामध्ये  झाले कैदहॉटेलमालक मालवे यांनी हॉटेल परिसर व हॉटेलमध्ये ‘’सीसीटीव्ही’’ कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यात चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यापासून ऐवज घेऊन पोबारा केल्यापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम कैद झालेला आहे. तसेच एका चोरट्याचा चेहराही कॅमेऱ्याने स्पष्ट टिपला आहे. त्यामुळे गुन्ह्याची लवकरच उकल होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी