ठळक मुद्देपोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल केला गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: स्टेट बँक रोड परिसरामध्ये ३ ठिकाणी १५ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून जवळपास २ लाख ५0 हजारांचा माल लंपास केला. या संदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मेहकर येथील हरीश नारायण लोहिया यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, त्यांचे औषधे व बी- बियाण्यांचे दुकान, जैन मंदिर व मेडिकल अशा ३ ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. जैन मंदिरातील दान पेटी, चांदीचे मुकुट, दुकानातील कपाट फोडून व इतर नगदी असे जवळपास २ लाख ५0 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत लोहिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.