बकरी ईद साजरी
अमडापूर : परिसरात बुधवारी (दि. २१) बकरी ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमडापूर पोलिसांकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कार्यक्रम रद्द करून साधेपणाने बकरी ईद साजरी झाली.
दुचाकी लंपास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले
चिखली : तालुक्यात काही दिवसांपासून दुचाकी चोरी जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. १९ जुलै रोजी अमडापूर येथील घरासमोर दुचाकी लंपास झाल्याच्या घटनेनंतर अनेकांना घरासमोर दुचाकी उभी करण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे काहींनी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत.
ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवा
बुलडाणा : ओबीसी आरक्षणाचा मुद्द ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकारच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी १९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी दत्ता खरात, माधव हुडेकर व पदाधिकारी उपस्थित होते.
विद्युत चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ
मोताळा : विद्युत तारांवर आकडा टाकून विद्युत चोरी केल्याप्रकरणी राहूड येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील विद्युत चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.