शुक्रवारी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभिकरण करण्यासाठी मंजूर चार कोटी रुपयांचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. संजय रायमुलकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेना तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, नगर परिषदेचे गटनेता संजय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲड. सुरेशराव वानखेडे, मुख्याधिकारी सचिन गाडे, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शरद म्हस्के, जिल्हा परिषद कृषी सभापती राजेंद्र पळसकर, पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव, जिल्हा परिषद सदस्य आशिष राहाटे, विद्यार्थी सेनेचे प्रमुख ऋषी जाधव, भास्करराव गारोळे, दुर्गादास राहाटे, पी. आर. देशमुख आदी उपस्थित होते.
प्रारंभी खा.प्रतापराव जाधव व सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शहरातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी विशेष अनुदान म्हणून पाच कोटी रुपये व डीपी रस्त्यासाठी दहा कोटी, शिवाजीनगरात ओपन स्पेसमधील जागेत एक कोटीचे नाना-नानी पार्क आजोबा-आजी उद्यानाचे लवकर कामे सुरू करणार असल्याचेही खा.जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगर परिषदेचे उपाध्यक्ष जयचंद भाटिया यांनी केले. सूत्रसंचालन विलास तेजनकर विकास जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपरिषदेचे नगरसेवक पाणीपुरवठा सभापती दीपिका रहाटे, शिक्षण सभापती शारदा सास्ते, नियोजन सभापती तोफिक कुरेशी, आरोग्य सभापती हलीमा बी गवळी, ओम सोभागे, संगीता रिंढे, ज्योती घोडे, मीरा तायडे, कमलाबाई लष्कर, मनोज जाधव, रामेश्वर भिसे, पिंटू सूर्जन, विकास जोशी, अक्काबाई गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. (वा.प्र.)