बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी झाला आहे. २0१६-१७ च्या खरीप हंगामात १ लाख ५८ हजार ४00 मे. टन रायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले. याशिवाय यावर्षी नियोजनानुसार प्राप्त आणि गतवर्षीचे शिल्लक, असे एकूण ३८ हजार ४४0 मे. टन रासायनिक खत सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्यांना खतांची टंचाई भासणार नाही.२0१६-१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ४९ हजार हेक्टरवर १६ पिकांच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. हंगामाच्या सुरुवातीला शेतकर्यांना खतांची टंचाई निर्माण होऊन नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेतली आहे. यामुळे या हंगामासाठी १ लाख ५८ हजार ४00 मे. टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी ३0 एप्रिलपर्यंत ५ हजार ८९५ मे. टन खत प्राप्त झाले. तर गतवर्षीचे शिल्लक ३२ हजार ५४५ मे.टन रासायनिक खत सध्या उपलब्ध आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी जोरदार तयारीला लागला आहे. एकूण पिकांची संख्या व वाढलेले पेरणीक्षेत्र यांच्या तुलनेत आवश्यक खतांची उपलब्धता सध्यातरी कमी आहे. येत्या काही महिन्यात खत पुरवठय़ात वाढ होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र, वर्तमानात खतांची कमतरता शेतकर्यांसाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते, हेही तेवढेच खरे. मात्र, हीच बाब लक्षात घेऊन व्यापारीही चढत्या भावाने खतविक्री करून शेतकर्यांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
यावर्षी खतांची टंचाई नाही!
By admin | Published: May 03, 2016 2:08 AM