लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरात प्लास्टीक बंदीच्या नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. आठवडी बाजारासह अनेक ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टीकचा वापर होताना दिसून येत आहे. या प्रकाराकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार वाढत आहे. प्लास्टीकचा वापर टाळण्यासाठी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.प्लास्टीकचा वापर सर्वांसाठीच धोकादायक आहे. प्लास्टीक कचºयाचे विघटन होत नसल्याने हा कचरा नाल्यांमध्ये अडकून सर्वत्र दुर्गंधी पसरते. प्लास्टीक कचरा साचल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. एवढेच नव्हे तर मोकाट गुरांसाठीदेखील प्लास्टीक घातक आहे. इतर चाºयासोबत प्लास्टीक जनावरांच्या पोटात गेल्यास त्या जनावराचा मृत्यूही होऊ शकतो. सर्व दृष्टीने प्लास्टीक घातक असल्याने या प्लास्टीक कॅरीबॅगच्या वापरावर शासनाने निर्बंध आणलेला आहे. हा नियम मोडणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सुरूवातीच्या काळात पालिकेने प्लास्टीक वापराविरोधात मोठी मोहिम हाती घेतली होती. त्यावेळी अनेक व्यापाºयांसह प्लास्टीक वापरणाºया नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. परिणामी प्लास्टीकचा वापर बºयाअंशी कमी झाला होता. मात्र हळूहळू ही मोहिम थंडावली व पुन्हा प्लास्टीकचा वापर जोमात सुरू झाला. आता पालिका प्रशासन या प्रकराकडे कानाडोळा करीत असल्याने नागरिक व व्यापाºयांच्या मनात प्लास्टीक वापरासंदर्भात कुठलीही भिती राहिलेली नाही. प्लास्टीक बंदीच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्लास्टीक वापरणाºयांविरोधात दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांच्या मनात भिती निर्माण होऊन खºया अर्थाने प्लास्टीक वापरावर निर्बंध येईल. (प्रतिनिधी)
प्लास्टिक बंदीच्या नियमाचे होतेय उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 2:30 PM