शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

बुलडाणा जिल्ह्यात सुपर स्प्रेडरच्याही होणार कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:43 AM

Corona tests of the Super Spreader बुलडाणा पालिकेने २० फेब्रुवारी रोजी शहरातील व्यापारी, लघु व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यानुषंगाने नियोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती पाहता पालिकास्तरावरही सुपर स्पेरडरवर नजर ठेवण्यासोबतच संदिग्धांच्या तातडीने चाचण्या करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यानुषंगाने बुलडाणा पालिकेने २० फेब्रुवारी रोजी शहरातील व्यापारी, लघु व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यानुषंगाने नियोजन केले आहे.दरम्यान, थेट मोबाईल व्हॅन उपलब्ध करून त्या माध्यमातून व्यापारी, लघुव्यावसायिक, फेरीवाले, भाजीपाला विक्रेते व तत्सम सुपर स्प्रेडरच्या व्याख्येत बसणाऱ्यांचे स्वॅब संकलित करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्थात संबंधितांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी एस. रामास्वामी यांनी निर्देश दिले होते. चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करून शाळा, महाविद्यालये ही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सुपर स्प्रेडरच्या चाचण्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालिका तथा ग्रामीण भागासाठी तहसीलस्तरावर देण्यात आले होते. त्यानुषंगाने बुलडाणा पालिकेने आता पावले उचलली असून सुपर स्प्रेडरच्या चाचण्या करण्याच्या दिशेने पाऊल उचलले असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गेल्या एक वर्षापासून कोरोना संसर्गाविरोधातील लढ्यात महत्त्वाची भूमिका बुलडाणा पालिकेने बजावलेली आहे. कोरानामुळे मृत्यू झालेल्या परंतु त्यांच्या अंत्यविधीसाठी समोर न आलेल्या मृतकांच्या पार्थिवावर बुलडाणा पालिकेने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले होते. एक मोठी जबाबदारी बुलडाणा पालिकने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान उचलली होती.  आता त्याच धर्तीवर बुलडाणा शहरातील सुपर स्प्रेडरच्या व्याख्येत बसणाऱ्या व्यावसायिक, लघु व्यावसायिक, फेरीवाले, हॉटेल व्यावसायिक तथा त्यांच्याकडील कर्मचारी यांच्या चाचण्या करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने २० फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. शहरातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, फेरीवाले व संघटनेचे अन्य सदस्य या छोटेखानी बैठकीस उपस्थित होते. यावेळी पालिकेने संबंधितांकडील कर्मचारी, कुटुंबातील सदस्य यांची माहितीही संकलित केली. तसेच येत्या दोन ते तीन दिवसा संदिग्ध वाटणाऱ्यांचे स्वॅब घेण्यासाठी एका मोबाईल व्हॅनचीही उपलब्धता करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या